- बेनकनहळळी गावातून आर.आम.चौगुले यांना जाहीर पाठिंबा
सुळगा (हिं.) / वार्ताहर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील समितीचे उमेदवार आर. आर. चौगुले यांचा मतदार संघातील बेनकनहळळी गावात क्रिकेट प्रेमींकडून काल रविवार दि. १६ एप्रिल रोजी सायं. ८ वा. शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत मनोहर किणेकर, ऍड. सुधीर चव्हाण, लक्ष्मण होनगेकर यांच्यासह समिती नेते उपस्थित होते.
गावातून झंझावती प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी गावातील म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठी भाषिक यांच्यासह गावातील युवावर्ग मोठ्या संख्येने प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी गेल्या ६५ वर्षांहून अधिक काळ लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने या निवडणुकीत मतदारसंघाची धुरा युवा नेते आर. एम.चौगुले यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे तालुक्यातील मराठी भाषिक जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला असून ग्रामीण मतदारसंघात समितीच्या विजयासाठी मराठी भाषिकांनी एकीची वज्रमुठ आवळली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात झाली असून महिलाही जागृत झाल्या आहेत. म्हणूनच कालच्या प्रचार फेरी दरम्यान महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
0 Comments