सुळगा (हिं.) / वार्ताहर
म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची आज सायंकाळी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कंग्राळी बुद्रुक येथे प्रचारफेरी काढण्यात आली. तत्पूर्वी गावात आगमन होताच त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
यानंतर गल्लोगल्ली औक्षण करून महिलांनी आगामी निवडणुकीत विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी ॲड. सुधीर चव्हाण यांनी कंग्राळी (बुद्रुक) गावातर्फे आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा दिला.
प्रचारफेरी दरम्यान आर. एम. चौगुले यांच्यासमवेत म. ए. समितीचे नेते, शाम पाटील, आर. आय. पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कंग्राळी खुर्द येथून प्रचाराचा शुभारंभ -
प्रारंभी आज सकाळी कंग्राळी खुर्द गावातून छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी म. ए. समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आर. आय. पाटील यांनी कंग्राळी खुर्द गावचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, युवा नेते ॲड. सुधीर चव्हाण, शाम पाटील आणि गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान नावगे, किणये, कर्ले, बहाद्दरवाडी, कुट्टलवाडी, रणकुंडये संतीबस्तवाड, जानेवाडी गावातून आर. एम. चौगुले यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे.
-आर. एम. चौगुले यांच्या प्रचारात भव्य मोटरसायकल फेरी-
हलगा विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारात भव्य अशी मोटरसायकल फेरी काढण्यात आली.
प्रारंभी हलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवमुर्तीला समितीने नेते ॲड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रेरणामंत्र झाल्यानंतर या भव्य मोटरसायकल फेरीला सुरुवात करण्यात आली. प्रथमतः हलका गावातील प्रत्येक गल्लीमध्ये ही फेरी जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, आर. एम. चौगुलेंचा विजय असो, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. भगवेध्वज, भगव्या टोप्या व गळ्यामध्ये भगवी शाल परिधान करून कार्यकर्त्यांची भव्य अशी मोटरसायकल फेरी जात होती. हलगा झाल्यानंतर बस्तवाड, कोंडुसकोप्प, कोळिकोप, तारीहाळ, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी या गावांमध्येही फेरी काढण्यात आली. प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत वातावरण समितीमय केले. शिंदोळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या फेरीची सांगता करण्यात आली.
या फेरीमध्ये हलगा विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर संताजी, सागर बिळगोजी, विठ्ठल पाटील, मारुती बेळगावकर, मल्लाप्पा कालिंग, कल्लाप्पा संताजी, प्रसाद धामणेकर, राजू कानोजी, महादेव सामजी, सुधीर खनगावकर, रमेश खानगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments