बंडीपूर दि. ९ एप्रिल : 

निसर्गाचे रक्षण करणे हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत ; आणि त्याच वेळी जगातील  ७५ टक्के वाघ भारतात आहेत.  प्रोजेक्ट टायगर वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनात आघाडीवर असून त्याचे यश केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट टायगर प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील बंडीपुर  व्याघ्र संरक्षण अभयारण्याला भेट दिली. यावेळी तिने टायगर सफरही केली. यानंतर त्यांच्याहस्ते व्याघ्र संरक्षणावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर  त्यांनी 'व्याघ्र संवर्धनासाठी अमृत काळातील व्हिजन' या अहवालाचे तसेच अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाचा समावेश अहवाल प्रकाशन केले. वाघा प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे उचित्य साधने स्मारक नाण्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, प्रोजेक्ट टायगरची ५० वर्षे पूर्ण होत असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. भारताने केवळ वाघाचे रक्षण नाही तर त्यांच्या वाढीसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक अधिवास आणि पर्यावरण उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्ष वर विश्वास ठेवत नाही परंतु त्यांच्या सह अस्तित्वाला मान्यता देतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे हा संस्कृतीचा भाग आहे. म्हणूनच, वन्यजीव संवर्धनात आपल्याकडे अनेक अद्वितीय कामगिरी आणि विक्रम झाले आहेत.

आयबीसीए जगातील सात मोठ्या व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल, उदा. वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, प्यूमा, जग्वार आणि चित्ता, या प्रजातींना आश्रय देणार्‍या श्रेणीतील देशांचे सदस्य यात आहेत असे ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतरांगेतील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पला भेट दिली. थेप्पाकडू एलिफंट कॅम्प हा आशिया खंडातील सर्वात जुना हत्ती कॅम्प आहे.  येथे मोदींनी हत्तींना ऊस खाऊ घातला तसेच माहुतांशी संवाद साधला. ‘द एलिफंट विस्फरर्स’ या ‘ऑस्कर 2023’ विजेत्या माहितीपटातील जोडप्याची अर्थात बोमन आणि बेलीची आणि रघु हत्तीची भेट त्यांनी घेतली.