• समाजकार्यासाठी शुभेच्छा देत केले अभिनंदन 

शिवप्रताप महानाट्यतील कलाकार युवक -युवती,
बाळगोपाळां समवेत बेळगाव ग्रामीण भाजपचे
माजी अध्यक्ष विनय विलास कदम



सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सुळगा (हिं.) येथील श्री गणेश मित्र मंडळाने गावातील मराठा समाजाच्या युवक-युवतींना एकत्रित करून छ. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित 'शिवप्रताप' हे महानाट्य निर्मित केले आहे. ग्रामीण भागात भावी पिढीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराजांचे कार्य व  इतिहास ज्ञात होण्याच्या उद्देशाने मंडळाने राबविलेला हा उपक्रम निश्चितचं स्तुत्य आहे. 

याचीच दखल घेत भाजपा ग्रामीणचे माजी अध्यक्ष तथा मराठा नेते विनय विलास कदम यांनी या महानाट्याच्या कलाकार युवक - युवतींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि समाजकार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. विनय कदम हे ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्याची ग्रामीण मतदारसंघातील जनतेतून प्रशंसा होत आहे.