बेळगाव / प्रतिनिधी 

पहिल्या रँडमायझेशननंतर, मतदारसंघांनुसार वितरित केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार ,जिल्ह्यातील अठरा मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात पाठवण्यात येतील. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार व जिल्हाधिकारी नितेश पाटील, यांनी दिली .

हिंडलगा गावात असलेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम गोदामात रँडमायझेशननुसार संबंधित मतदारसंघात ईव्हीएम पाठविण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

रँडमायझेशनमध्ये , जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आलेले 5321 बॅलेट युनिट, 5321 कंट्रोल युनिट आणि 5765 व्हीव्हीपीएटी संबंधित मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव असलेले स्टिकर चिकटवून ते ट्रंकमध्ये सुरक्षित करून आणि सील केल्यानंतर मतदान केंद्रांवर पाठवले जातील. 

कडेकोट पोलीस बंदोबस्तात जीपीएस सुसज्ज कंटेनर वाहनांतून ईव्हीएमची वाहतूक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील आणि त्यांना ईव्हीएम वाहतूक प्रक्रिया पाहण्याची परवानगी दिली जाईल.

प्रत्येक मतदान केंद्रासाठी, संबंधित रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुक्रमांकानुसार गोदामातील रँडमायझेशननुसार त्यांना वाटप करण्यात आलेले ईव्हीएम मिळाले.जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वत: काही काळ प्रत्येक मतदारसंघातील स्वतंत्र काउंटरवर जाऊन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे अनुक्रमांक तपासले व त्यांचे वाटप केले.

याप्रकरणी कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.विविध मतदारसंघातील निवडणूक अधिकारी गीता कौलगी, डॉ. राजीव कुलेर, डॉ.रुद्रेश घाळी, बलराम चव्हाण, राजशेखर डंबाल, नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे आदी उपस्थित होते.