सौंदत्ती / वार्ताहर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आमिष दाखवण्यासाठी देण्यात येणाऱ्या भेट वस्तूंवर निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची करडी नजर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी धाड घालून भेटवस्तूंचा अवैध साठा जप्त करण्यात आलेला आहे
दरम्यान आज (शनिवार दि. २२ एप्रिल रोजी) सौंदत्ती तालुक्याच्या तेगिहाळ गावालगत असलेल्या सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्याच्या हद्दीतील एका फार्म हाऊसच्या टिन शेडमध्ये सुमारे १६०० कुकर जप्त करण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या निर्देशानुसार पोलीस आणि एफएसटीने काही माहितीच्या आधारे एफ. एस. कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ च्या कलम ५४ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही कारवाई केली.
0 Comments