कागवाड / वार्ताहर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याच्या सीमाभागात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी अवैध रक्कम, मद्य, मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येत असलेल्या साहित्याच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवून कारवाई सुरू आहे.
अशाच प्रकारे एसएलबी नियमांची पूर्तता न करता नेण्यात येत असलेली ७० लाख रुपयांची रोख रक्कम कागवाड - मिरज तपासणी नाक्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली.
0 Comments