• समरजीतसिंह घाटगे यांचे प्रतिपादन
  • चंदगड तालुक्यातील शक्तीकेंद्र प्रमुख व प्रभारींच्या बैठकीत मार्गदर्शन 

चंदगड / लक्ष्मण यादव

राज्यातील आगामी विधानसभा  निवडणुकीत चंदगड मतदार संघाची जबाबदारी असल्याने कोणत्याही परिस्थितीत २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचाचं आमदार निवडून येणार  मात्र त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  समरजीतसिंग घाटगे यांनी केले.

शनिवारी लोकसभा प्रवास योजना बूथ सक्षमीकरण अभियानांतर्गत  चंदगड तालुक्यातील शक्ती केंद्र व प्रभारी यांची बैठक येथील सोयरीक मंगल कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, संग्राम कुपेकर  यांच्यासह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांनी समरजीतसिंह घाटगे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यांनी केले. यावेळी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले  मा. संग्राम कुपेकर यांचा भाजप कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी चंदगड तालुका भाजप तर्फे सत्कार केला.

यावेळी चंदगड मतदारसंघातील ७६ शक्तीकेंद्र व ३७८ बूथ सक्षमीकरणासंदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात आली.

या बैठकीला ॲड. हेमंत कोलेकर, जि. पं.  सदस्य सचिन बल्लाळ, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अशोक कदम, प्रताप सूर्यवंशी, शांताराम बापू पाटील, चंदगड मतदारसंघातील शक्ती केंद्रप्रमुख व प्रभारी उपस्थित होते. आभार तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी मानले.