- बेळगाव उत्तर मधून राजू सेठ तर दक्षिणमधून प्रभावती मास्तमर्डी यांना उमेदवारी
बेळगाव / प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून प्रभावती मास्तमर्डी चावडी यांना तर उत्तर मतदार संघातून माजी आमदार फिरोज सेठ यांचे बंधू आसिफ (राजू) सेठ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अथणी मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, रायबाग मतदार संघातून महावीर मोहिते आणि अरभावी मतदारसंघातून अरविंद दळवाई यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
0 Comments