विजयपूर / दिपक शिंत्रे

समकालीन हिंदी भाषा आणि साहित्य: या विषयावर दि. 10 आणि 11 मार्च  रोजी बी. एल  डी.ई. संस्थेच्या ऐ. एस.  पाटील वाणिज्य महाविद्यालय  विजयपूर, एस.  बी.  कला आणि के. सी पी सायन्स कॉलेज, विजयपूर, मुंबई हिंदी अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 10 रोजी सकाळी  प्रा.  बी.  एस.  नावी कुलसचिव, कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठ, विजयपूर यांच्या हस्ते सकाळी 9-30 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. 

प्रमुख वक्ते प्रा. अर्जुन चव्हाण, माजी हिंदी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्रमुख पाहुणे डॉ. अनिता कपूर, पत्रकार,  कायदेशीर सेवा, प्रसिद्ध ज्योतिषी, अमेरिका, डॉ. अरुणा सब्बरवाल, लेखिका, लंडन., प्रो. एस.  जी.  तालिकोटी, , कोषाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना आणि B.L.D.E. संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.आर.बी.  कोटनाल चर्चासत्रात उपस्थित राहणार आहेत.

 परिसंवादात देशातील विविध राज्यांतून आमंत्रित केलेले 250 हून अधिक स्पर्धक, विषय व्याख्याते, संशोधक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी सहभागी होणार  आहेत. 

 बी.एल.डी इ संस्थेचे अध्यक्ष, आमदार माननीय डॉ. एम. बी.  पाटील  यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 प्रतिष्ठित बी. एल  डी. ई. संस्थेच्या ऐ. एस.  पाटील वाणिज्य महाविद्यालयच्या माजी विद्यार्थी संघटनेनेही प्रायोजकत्वाची जबाबदारी घेतली आहे.