सांबरा / मोहन हरजी
सालाबादप्रमाणे सांबरा येथे बुधवार दि. २२ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त श्री बसवाण्णा यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात अभिषेक व पुजा - अर्चा आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर दुपारी १२ वा. आंबील गाड्यांची तर सायंकाळी ६ वा. नंतर शोभेच्या गाड्यांची मिरवणूक उत्साहात पार पडली. बसवाण्णा यात्रेसह आंबील व शोभेच्या गाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी गावातील बालचमुंनी साकारलेले शोभेचे गाडे लक्षवेधी ठरले.एकंदरीत देवस्थान कमिटीचे नियोजन व ग्रामस्थांच्या सहकार्यातून यात्रा यशस्वी पार पडली.
0 Comments