- एक जखमी, मृत तरुण बेळगाव अझादनगरचा
चंदगड / प्रतिनिधी
तिलारी घाटात पडलेला टेम्पो काढण्यासाठी आलेली क्रेन टेम्पो बाहेर काढत असताना ती दरीत कोसळून एक जण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. जावेद इब्राहिम अत्तार (रा. आझाद नगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अर्शफ कयामत अन्सारी अन्सारी असे जखमीचे नाव आहे.
तिलारी घाटात शनिवारी पडलेला बोलोरो पिकअप काढण्यासाठी रविवारी बेळगाव येथून क्रेन मागवली होती. पण बोलोरा पिकअप बाहेर काढत असताना क्रेनवरील ताबा सुटल्याने ती दरीत कोसळून एक जण ठार झाला.तरुणाच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
चंदगड पोलिस स्थानकात माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक हणमंत नाईक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण क्रेन दरीत पडली होती. त्यामुळे आत अडकलेल्या मृत व्यक्तीला अंधार पडल्याने बाहेर काढता आले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी दुपारी मृतदेह बाहेर काढला. तिलारी घाटात दिवसेंदिवस अपघात वाढत चालले आहेत. पण सुरक्षेसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
0 Comments