बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक बुधवार दि. ८ मार्च रोजी दुपारी ३ वा. मराठा मंदिर गोवा वेस येथे होणार आहे. येळळूर राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोनदा अनावरण करण्याच्या निमित्ताने झालेल्या राजकारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे, त्यामुळे आराध्य दैवतेचे शुद्धीकरण करण्याच्या कार्यक्रमाची तारीख ठरवण्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे.
तेव्हा शहर समिती व बेळगाव तालुका समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व सरचिटणीस एम. जी. पाटील यांनी केले आहे.
0 Comments