विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपुर शहर विकास प्राधिकरणाच्या सभागृहात 2023-24 या वर्षासाठी बजेट आणि मासिक बैठक झाली.
प्राधिकरणाचे अध्यक्ष परशुरामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त शंकर गौडा सोमणाल यांनी अर्थसंकल्प सादर केला.
या बैठकीत महसूल वसुली व 104.88 कोटी रुपयांच्या खर्चासाठी एकूण 122.60 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असल्याचे
नगरविकास प्राधिकरणाचे आयुक्त शंकरागौडा सोमनाल यांनी सांगितले. विजयपूर शहराचे आमदार बसनागौडा पाटील ( यतनाळ) प्राधिकरणाचे सदस्य अनिल सबरद, माडीवाला यलवार, व्यंकटेश कुलकर्णी, लक्ष्मी कन्नोळ्ळी, रेवणसिद्दप्पा जिराली आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments