विजयपुर / प्रतिनिधी 

शहरातील प्रतिष्ठित  बीएलडीई  संस्थेचे संस्थापक जनक डॉ. फ. गु. हलकट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने मान्यता दिली असून त्यांना प्रशंसा प्रमाणपत्र मिळाले आहे.

इनोव्हॅटम इंजिनीअरिंग कंपनीने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना वेबसाइट डेव्हलपमेंट आणि होस्टिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. शैक्षणिक आणि व्यावसायिक संसाधन व्यक्तींनी विद्यार्थ्यांसाठी वेबसाइट विकास आणि होस्टिंगबद्दल माहिती सादर केली.

शैक्षणिक डोमेनमधील 207 लाईव्ह सर्व्हरवर आयोजित केलेल्या कार्यशाळेत एकूण 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यशाळेत  वेबसाईट लाईव्ह सर्व्हरवर होस्ट केल्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून कौतुकाचे प्रमाणपत्र मिळाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  व्ही.  जी.  संगम आणि प्रा.  आर.  डी.  सलगार यांनी ही माहिती दिली.