- मजदूर नवनिर्माण संघ व येळ्ळूर ग्रा.पं.तर्फे आयोजन
कल्लेहोळ / गोपाळ पाटील
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येळ्ळूरच्या रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या महिलांसोबत कष्टकरी कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' माध्यमातून येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या सोबत महिला दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोगतज्ञ डाॅ. सुरेखा पोटे, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, प्रभारी पीडिओ सदानंद मराठे व राज्यस्तरीय ग्रामीण महिला वेटलिफ्टर नकुशा (दिशा) पाटील लाभले होते. येळ्ळूरच्या महिला कामगारांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ. सुरेखा पोटे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून महत्त्व विशद केले. ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी महिलांना शुभेच्छा देत सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर येळ्ळूर पंचायतीच्या वतीने पीडिओ सदानंद मराठे यांनी कार्यक्रमाला उपस्थित रोहयोच्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
उदयोन्मुख युवा वेटलिफ्टर नकुशा (दिशा) पाटील यांनी महिलांशी बोली भाषेत संवाद साधत त्यांच्या मुलींना फक्त चुल आणि मुल सांभाळण्यासाठी तयार न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार करा असे सांगितले. प्रारंभी 'मजदूर नवनिर्माण संघाच्या' वतीने राहुल पाटील यांनी समस्त महिला वर्गाला वंदन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख करून दिली व शेवटी आभार मानले.
कार्यक्रमानंतर सर्व महिलांना पंचायतीच्या वतीने चहा व बिस्किटे दिली. या कार्यक्रमाला कौस्तुभ पोटे, निर्मला बरसाकाळे, गुरुदेवी रामदुर्ग, शोभा कुंडेकर, कविता गोरल, रेश्मा कुरंगी, सुमन गोरल व ज्योती मेलगे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments