बेंगळूर / प्रतिनिधी
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने वेतन वाढीचा आदेश जारी केला असून १ एप्रिल पासून लागू होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मागणी केली होती. यावेळी आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी शासन स्तरावर चर्चा करून पगार वाढीसाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते.
नोकरीत रुजू झाल्यास २० हजार पेक्षा कमी मानधन असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के वाढ दिली जाईल. ज्यांनी ५ वर्षांहून अधिक काळ सतत काम केले आहे, त्यांनाही १५ टक्के वाढ केली आहे. एनएचएम कंत्राटी तज्ञांसाठी, ३-५ वर्षे सेवा असलेल्यांसाठी ५ टक्के, ५ - १० टक्के सेवा असलेल्यांसाठी टक्के आणि १० वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्यांसाठी १५ टक्के वाढ केली आहे.
0 Comments