- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश
बेळगाव / प्रतिनिधी
राजहंसगड किल्ला परिसरात सार्वजनिक तसेच पर्यटकांना दि. २१ मार्च ते ४ मे या कालावधीत तात्पुरती प्रवेश बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत.
राजहंसगड किल्ला परिसरात विविध विकास कामांपैकी एक रस्त्याचे ग्रॅनाईट दगडी बांधकाम पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र दररोज मोठ्या संख्येने पर्यटक व लोकांची ये - जा होत असल्याने हे काम शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करणे अवघड आहे. त्यामुळे १५ दिवस स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची विनंती जिल्हा पर्यटन विभागाचे उपसंचालकांनी केली आहे. या विनंतीनुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी राजहंसगडावर तात्पुरती प्रवेश बंदी जारी केली असून जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments