बेळगाव / प्रतिनिधी 

बाग परिवार सामुहातर्फे नुकताच मराठी भाषादिन मिलिटरी महादेव मंदीर येथे उत्साहात साजरा झाला. एकापेक्षा एक सरस अशा मराठी भाषा या विषयाला अनुसरुन कविता बहारदार शैलीत सादर करुन कवींनी आपला मराठी भाषेवरील प्रेम व जिव्हाळा दाखवून दिला.

प्रारंभी विजया उरणकर यांनी स्वागतगीत सादर केले.निकीता भडकूंबेनी सुंदर सुत्रसंचालन केले.रोशनी हुंदरे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचे महत्व सांगुन माय मराठी ही कविता सादर केली.अस्मिता आळतेकर- माझी माय मराठी,अंजली देशपांडे- मानाचा तुरा, विजया उरणकर- नर्मदा परिक्रमा, अशोक सुतार - आम्ही आहोत,आरती पाटील-मायबोली,स्मिता किल्लेकर - माय मराठी, अस्मिता देशपांडे- अभिमान मला की मी मराठी आहे हे विडंबन,मनिषा नाडगौडा- भवितव्य मराठीचे,अपर्णा पाटील- मायमराठी, मधु पाटील -स्त्री एक शिल्पकार, गुरुनाथ किरमीटे-स्वानुभव,भरत गावडे- माय मराठी,शीतल पाटील- मराठी संस्कृती ,चंद्रशेखर गायकवाड - अशावेळी अशा बहारदार कविता कवींनी सादर केल्या.दिलीप सावंत यांनी सर्वांच्या कवितांना उत्स्फूर्तपणे दाद देत सुंदर लेखाजोगा सादर केला.मधु पाटील यांनी आभार मानले.

वर्षभरातील कार्यक्रमातून जुने समुह प्रमुख निकीता भडकुंबे आणि मनिषा नाडगौडा यांनी चांगले सहकार्य केले.त्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन नवीन समुहप्रमख म्हणुन स्मिता किल्लेकर आणि अस्मिता देशपांडे यांची एकमताने निवड घोषित केली.व 2023या चालू वर्षाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली.