सांबरा / मोहन हरजी
सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा येथे बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेच्या एसडीएमसी सदस्या सविता सोनजी, पूजा लोहार, रेश्मा हुच्ची, ज्योती चुनारी, सुधा गिरमल ,रूपा गुरव, उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमांमध्ये सिद्धी देसाई हिने विद्यार्थ्यांच्या वतीने भाषण केले तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका ए. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले श्रीमती टी. व्ही. पाटील यांनी महिलांना उद्देशून भाषण केले. श्रीमती आर. बी. लोहार यांनी स्त्रीचे महत्त्व पटवून दिले श्रीमती के. एन.हलगेकर टीचर यांनी सुद्धा महिलांना उद्देशून भाषण केले. सूत्रसंचालन श्री व्ही.एस. कंग्राळकर यांनी केले व श्री ए.बी.पागाद यांनी आभार मानले.
0 Comments