कोल्हापूर / प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 300 वर चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. मराठी चित्रपट सृष्टीत सहाय्यक भूमिकेने भालचंद्र कुलकर्णी यांनी छाप सोडली होती.
भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी सिनेमातील मोठे योगदान राहिले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.
भालचंद्र कुलकर्णी यांनी गेल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी दमदार भूमिका साकारल्या. सहाय्यक भूमिकेसाठी भालचंद्र कुलकर्णी यांना ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रेक्षकांच्या समोर आले होते.
0 Comments