- ग्रा. पं. सदस्या पद्मश्री पाटील यांची मागणी
- पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या कुप्पटगिरी गावातील जलजीवन योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. गावात बरगाव पंचायतीने 22 ऑक्टोबर रोजी जलजीवन मिशन प्रकल्प सुरू केला आहे, परंतु ठेकेदार बसवराज हुंदरी हे काम लवकर पूर्ण करत नाही. या कामासाठी 1 कोटी 18 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र काम दर्जेदार होत नाही. सर्वच रस्त्यांवरील काम अर्धवट थांबले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा ग्रा. पं. सदस्या पद्मश्री पाटील यांनी ग्रामीण पेयजल विभागाच्या कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
0 Comments