- कंग्राळी खुर्द ग्रामस्थांची मागणी
- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ला सादर केले निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
श्री जोतिबा यात्रा काळात सासनकाठी व भक्तांना निवासांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) गावच्या ग्रामस्थांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेकडो वर्षांचा परंपरेप्रमाणे कंग्राळी खुर्द गावची सासनकाठी व भक्त श्री जोतीबा यात्रेला जातात. तेथे गट क्र. 7 मध्ये 40X30 जागेत या गावची सासनकाठी व भक्तगण यात्रेवेळी 5 दिवस वास्तव करून राहतात. परंतू गेल्या वर्षापासून कांही स्थानिक लोक त्या ठिकाणी राहण्यास अटकाव करत आहेत. आता येत्या पौर्णिमेला श्री जोतीबा यात्रा होणार असल्याने यात्रा काळात सदर जागा आम्हाला परंपरेप्रमाणे मिळावी. त्यासाठी आम्ही नियमा प्रमाणे आम्ही भू -भाडे भरण्यास तयार आहोत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
सदर निवेदन कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्यावतिने अध्यक्ष यल्लापा पाटील सदस्य प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, वैजनाथ बेन्नाळकर , राकेश पाटील, मानकरी वाय. आर. पाटील , मनोहर पाटील, भटजी श्री सांगळे आदींनी पश्चीम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे म्हणजे कमिटीचे सचिव शिवराज नाईकवडी तसेच वरीष्ठ लिपीक मेहतर साहेब यांना सादर केले. त्यांनी निवेदनाचा स्वीकार योग्य ती कार्यवाही करण्यातद्वारे तुम्हाला यात्रा काळात जागा मिळवून देऊ असे ठोस आश्वासन दिले. तसेच अटकाव करणाऱ्यांनाही समज दिली जाईल असे सांगिलते. कमिटीचा या आश्वासनामुळे कंग्राळी खुर्दच्या भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments