बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते शिवाजी काढणीकर यांना कर्नाटक राज्य पंचायत विभागाने मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले आहे. या पदवीमुळे सीमा भागातील एका श्रमजीवी कार्यकर्त्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा यासाठी ते सातत्याने आंदोलने करीत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी शेतामधील तलावांची निर्मिती तसेच पाणी आडवा आणि जिरवा योजनेसाठी स्वतः अथक परिश्रम घेतले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या शिवाजी कागणीकर यांच्या कर्तुत्वाला गौरव लाभल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.