विजयपूर / दिपक शिंत्रे 

प्रतिवर्षाप्रमाणे भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगलाज मातेचा प्रकटदिन, जन्मोत्सव दि 19 मार्च रविवार रोजी सकाळी ठिक 10 वाजता भावसार समाज भवना समोरील श्री देवीच्या मंदिरात विशेष पूजा, महाआरती व प्रसाद वाटप करुन उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पंचमंडळाचे पदाधिकारी, सदस्य महिला, युवक व तरुण संघाचे पदाधिकारी व सदस्य समाज बंधू भगिनी उपस्थित होते.