रायबाग / वार्ताहर 

बावनसौंदत्ती (ता. रायबाग) येथे अबकारी खात्याच्या पथकाने बेकायदा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी राजू कृष्णप्पा मरिनायक (रा. बावनसौंदत्ती ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८ लिटर ६४० मिली बेकायदा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात आरोपीविरूद्ध  अबकारी कायद्या कलम ३२,३४ अन्वये गुन्हा क्र. ९०/२०२३ नोंदविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध कारवायांवर आळा घालण्यासाठी अबकारी आणि पोलिस खात्याने कडक लक्ष ठेवले आहे.