अथणी / वार्ताहर
ट्रॅक्टर आणि पिकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १ ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना कोकटनूर - अथणी राज्य मार्गावर रेणुका शुगर्स नजीक शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
गुडूसाब पीरसाब शबायत (वय ४५, रा. अथणी) असे अपघातातील मृत पिकअप चालकाचे नाव आहे. जखमींना अधिक उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार पिकअप वाहनातून गुडूसाब माल भरून बाजारासाठी निघाले होते. नियंत्रण सुटल्याने पुढे येणाऱ्या वाहनास पिकअपची जोरदार धडक बसली. यामध्ये मोटारीचा चक्काचूर झाला. या घटनेत गुडूसाब ठार झाला तर सात जण जखमी झाले. या घटनेची नोंद ऐगळी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments