- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कार्यवाही गतिमान
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बेळगाव मनपाने शहरातील राजकीय नेत्यांचे बॅनर हटविण्यात सुरुवात केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. याबरोबरच आजपासून निवडणुकीची आचारसंहिता ही लागू झाली असून बेळगाव शहर व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर असलेले शासकीय प्रकल्पाचे व राजकीय पक्षाचे फलक हटविण्यास बेळगाव प्रशासन आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील चन्नम्मा सर्कल, कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल रोड, अशोक सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, बसवेश्वर सर्कल आणि महत्त्वाच्या मार्गांवरील राजकीय पक्ष आणि नेत्यांचे बॅनर आज पाठविण्यात आले.
निवडणूक आयोगाने निवडणूक पारदर्शकपणे पार पडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक अधिकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.
0 Comments