बेळगाव / प्रतिनिधी 

जिजाऊ महिला मंडळ मजगाव व गिजरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मजगाव येथील विठ्ठल  रुक्मिणी मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा झाला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन भातकांडे शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका दया शहापुरकर व समाजसेविका बोबाटे उपस्थित होत्या.

दया शहापुरकर यांनी उपस्थित महिलांना मुलांच्या परिक्षा,ताणतणाव, आईचे मुलांशी वागणे कसे असावे, मुलांसाठी मोबाईलचा वापर कितपत असावा यावर सुंदर आणि महत्वाचे मार्गदर्शन केले.

यावेळी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहून ऑफिस  सांभाळत अल्पावधीतच यश संपादन करणाऱ्या अक्षता पिळणकर, निवेदिका सुनिता देसाई, ग्रंथपाल सविता पारनट्टी,आहारतज्ञ वैष्णवी मुतगेकर या चार महिलांचा कर्तृत्ववान महिला म्हणुन सत्कार करण्यात आला. डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांनी प्रास्ताविक करुन चारही सत्कार मूर्तींचा व दया शहापुरकर यांचा परिचय करुन दिला. बोबाटे यांचा परिचय निवेदिता मजुकर यांनी करुन दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मंजूषा गिजरे यांनी केले.कार्यक्रमास महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.