- प्रकाश हुक्केरी यांच्या फंडातून अभिवृद्धी करण्यासाठी 24.50 लाख अनुदान मंजूर
सुळगा (हिं.) / वार्ताहर
शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित अनुदानित ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगा ( हिंडलगा ) ता. जि. बेळगाव येथे शिक्षक विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार प्रकाश बाबांन्ना हुक्केरी यांच्या फंडातून मलनाडू अभिवृद्धी मंडळ यांच्या कडून अभिवृद्धी करण्यासाठी दोन वर्ग खोल्या बांधण्यासाठी 24.50 लाख अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
या दोन खोल्यांचे भूमिपूजन आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव ग्रामीणच्या आमदार सौ. लक्ष्मी हेबाळकर आणि त्यांचे सुपुत्र मृणाल हेबाळकर , सुळगा येथील काँग्रेसचे नेते श्री. भागांना नरोटी , यल्लाप्पा कलखांबकर यांच्याहस्ते कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी देवाप्पा ठाणू पाटील, कृष्णा पाटील, बी. डी. पाटील, पी. एम. पाटील, पी. एल.पाटील, अशोक पाटील, सिद्धया धारवाडमठ, जी.पी. मुचंडी, आर एन. हुलजी, पी.एम. मुतगेकर, रामू ए. गुगवाड, तसेच विविध शाळांचे पदाधिकारी शिक्षक व्यवस्था कमिटीचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments