बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील बागेवाडीनजीक करविनकोप्प गावातील शेतात एक विचित्र फुगा आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्पाय (गुप्तहेर) बलून असल्याची चर्चा या ठिकाणी सुरु होती.

हा फुगा कुठून आणि कधी उडून आला, हे माहीत नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. या फुग्यामध्ये काही इलेक्ट्रिक मशिन्स आढळून आल्याने फुग्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या मशिन्स कशा आहेत, याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फुगा ताब्यात घेत चौकशीला प्रारंभ केला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एका चिनी गुप्तचर फुगा आढळून आल्याने खळबळ माजली होती. अमेरिकेने नंतर तो फुगा नष्ट केला होता. करविनकोप्प शेतात असाच विचित्र फुगा आढळल्याने संशय निर्माण झाला आहे.