- उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
खानापूर / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी गोवा बनावटीचा तब्बल 68 लाख रुपये किमतीचा एकूण ३९०५.२८ लि. अवैध मद्यसाठा जप्त केला. बेळगावचे अतिरिक्त अबकारी अधिकारी (गुन्हे) डॉ. वाय. मंजुनाथ, बेळगाव विभागाचे सहआयुक्त फिरोज खान किल्लेदार यांच्या आदेशानुसार एम. वनजाक्षी, बेळगाव (दक्षिण) जिल्ह्याचे अबकारी उपायुक्त रवी एम., बेळगाव उपविभागाचे अबकारी उपअधीक्षक मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटक आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२३ च्या पार्श्वभूमीवर अबकारी अनियमितता रोखण्यासाठी अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार खानापूर झोनमधील जांबोटी-खानापूर एसएच-३१ रस्त्याच्या मोदेकोप्प क्रॉसनजीक मंगळवारी दुपारी उत्पादन शुल्क निरीक्षक दावलसाब शिंदोगी, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक जयराम जी. हेगडे यांच्यासह कर्मचारी मंजुनाथ बळगप्पनवर, प्रकाश डोणी यांनी ही कारवाई केली. फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी १८० एमएलचा एक ब्राऊन इंडिया बेंझ, मालवाहक १२ चाकी कंटेनर (क्रमांक: GJ-10/TT-8276). 21696 ,इंपीरियल ब्लू व्हिस्की बाटल्यांची वाहतूक करताना गोवा बनावटीची दारू जप्त करून एका आरोपीला अटक केली, गुन्हा नोंदवून प्रथम उपस्थित अहवाल न्यायालयात सादर केला.
0 Comments