बेळगाव / प्रतिनिधी 

मुजावर गल्ली येथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आदिशक्ती महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 26 रोजी अगदी थाटामाटात पार पडला. कार्यक्रमास  आए एम ए कर्नाटका स्टेटच्या उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

महिला मंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांच्या आरोग्याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच कोणत्याही कामाची सुरवात करताना प्रामाणिकपणा आणि जिद्द बाळगली तर त्या कामात यश नक्कीच मिळेल असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाची सुरूवात रोशनी हुंद्रे यांनी आपल्या सुत्रसंचलनाने केली.आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षपदी लिना पाटील, उपाध्यक्षा संजना चव्हाण, खजिनदार शालन हुंद्रे व सेक्रेटरी वंदना बाळेकुंद्री यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रगती सुर्यवंशी, प्राची कुट्रे, वैशाली हुंद्रे, उज्वला हुंद्रे, वर्षा सुर्यवंशी तसेच रेखा हुंद्रे यांनी श्रम घेतले.कार्यक्रमास मुजावर गल्लीतील आदिशक्ती महिला मंडळाच्या कविता हुंद्रे,सुधा कुट्रे,गीता सुर्यवंशी, रोहिणी हुंद्रे,रीना हुंद्रे, आस्मा मुजावर, शुभांगी चौगुले मयुरी हुंद्रे, पद्मा सुर्यवंशी तसेच आदी जेष्ठ महिला सदस्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी अर्चना चव्हाण यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.