खानापूर / प्रतिनिधी

खानापूर शहरात नवीन पोलिस स्थानक उभारण्याचे स्वप्न हे गेल्या कित्येक वर्षांपासून होते. आता ते पूर्ण झाले त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेची सेवा करणाऱ्या पोलिस खात्याला सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशी  इमारत लाभली. त्यामुळे पोलिसांचा  उत्साह वाढला असून  समाधान असल्याचे विचार  विधानसभा सदस्य एम. नागराजू यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.

प्रास्ताविक जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले. तर खानापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नायक यानी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील, बैलहोंगल डीएसपी रवी नायक,अतिरिक्त पोलिस प्रमुख एम. वेणूगोपाल, खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला नगरसेवक आप्पया कोडोळी, नगरपंचायतीचे चीफ ऑफीसर आर. के. वठार पोलिस खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डीएसपी रवी नायक यानी आभार मानले.