बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने गुरुवार (दि. २४ मार्च) रोजी बेळगुंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याबाबत चर्चा करण्यासाठी आज मंगळवार दि. २१ मार्च रोजी दुपारी ३ वा. शहरातील गोवावेस रेल्वे ओव्हर ब्रिज नजीक मराठा मंदिरच्या सभागृहात शहर आणि तालुका समितीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. सदर बैठकीला कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे सचिव ॲड. एम. जी. पाटील आदींनी केले आहे.
0 Comments