- धारवाड तालुक्यातील बेलूरनजीक घटना
- दुचाकीची बॅरिकेड्सला धडक बसल्याने अपघात
धारवाड / वार्ताहर
भरधाव दुचाकीची रस्त्यानजीक असलेल्या बॅरिकेड्सला धडक बसून झालेल्या अपघातात एका वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह तिची जागीच ठार झाली. धारवाड तालुक्यातील बेलूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात हा झाला.
सांगव्वा हेग्गनावर (वय २०), मायाक्का (वय १ वर्ष) दोघीही (रा. नगराळ, ता. चिक्कोडी) अशी अपघातातील मृत मायलेकींची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, जकप्पा हेग्गन्नावर पत्नी आणि मुलीसह हुबळीला जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील बॅरिकेड्सला दुचाकीची धडक बसली. त्यामुळे पत्नी सांगव्वा आणि मुलगी मायाक्का यांचा मृत्यू झाला तर जक्काप्पा जखमी झाले. या अपघातात एक वर्षीय मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच गरग पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सत्तीगौडर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद गरग पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments