बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार आणि बेळगाव शहर पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सुवर्ण विधान सौधच्या मध्यवर्ती सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली.

उत्तर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बेळगाव, धारवाड, गदग, बागलकोट, विजापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक, बेळगाव शहर पोलिस आयुक्त, डीवायएसपी, पोलिस निरीक्षकांसह 350 हून अधिक पोलिस अधिकारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत उत्तर विभागाच्या  जिल्ह्यांतील पोलिसांकडे सीआयडी कायदेशीर कक्षाचे संसाधन व्यक्ती म्हणून आलेले डॉ. महेश व्ही. यांनी राजकीय वाद, आमिषे, कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण आणि दारू-बिअरचे वाटप यासह विविध बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी गदगचे एस.पी. बी. आर. नेमगौडा, एच.टी.सोमशेखर, वेणुगोपाल, पी. व्ही.स्नेहा आदी अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.