बेळगाव / प्रतिनिधी
शतकोत्तर परंपरा लाभलेली आणि भारतातील नामांकित ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांपैकी एक Entice KGK, 1905, (केसरीमल घिसिलाल कोठारी) या पूर्णतः हिऱ्यांचे दागिने बनवणाऱ्या कंपनीचा लवकरच कर्नाटकात स्वतःचे ज्वेलरी प्रदर्शन (Jwellary Exhibition) करण्याचा मानस आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवार दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीतर्फे ग्राहकांसाठी बेळगाव शहरात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला कंपनीचे सीनियर मॅनेजर - सेल्स बीडी, संजय नामदेव, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ऋषिकेश घाग यांच्यासह कंपनीचे कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते.
प्रारंभी कंपनीचे सीनियर मॅनेजर - सेल्स बीडी, संजय नामदेव यांनी प्रास्ताविक करताना Entice, KGK 1905 कंपनी आणि डायमंड ज्वेलरी (हिऱ्यांचे दागिने) उत्पादनांबाबत माहिती दिली. यावेळी ग्राहकांना कंपनीच्या उत्पादन कार्यपद्धतीची माहिती दृष्य स्वरूपात दाखविण्यात आली.
यानंतर ग्राहकांनी संजय नामदेव आणि ऋषिकेश घाग यांच्याशी संवाद साधून डायमंड ज्वेलरी तसेच कंपनीतर्फे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या इतर सुविधांबाबतची माहिती घेतली.
या कार्यशाळेत Entice, KGK 1905 कंपनी निर्मित आकर्षक अशा हिऱ्यांच्या विविध दागिन्यांचे नमुने ग्राहकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. ग्राहकांनीही हे दागिने पाहून त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतली.
- प्रतिक्रिया -
(१)
![]() |
संजय नामदेव (Entice, KGK, सीनियर मॅनेजर - सेल्स बीडी) |
यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सीनियर मॅनेजर - सेल्स बीडी संजय नामदेव यांनी, जयपुर येथील Entice, KGK ही कंपनी देशातील हिऱ्यांचे दागिने बनविणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून इतरांनाही येथूनच हिऱ्यांचे दागिने पुरविले जातात. कंपनीच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्यामुळे मॉडेल आणून उत्पादनांची जाहिरात करण्यापेक्षा तोच फायदा ग्राहकांना देण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात १६ देशांमध्ये कंपनीचे काम सुरू आहे. याशिवाय मुंबई जयपूर हॉंगकॉंग आणि दुबई येथे रिटेल स्टोअरही आहेत. कंपनी मॅन्युफॅक्चरिंग ते रिटेल यासर्व प्रकारात कार्यरत असल्याने इतरांच्या पेक्षा Entice, KGK मध्ये ज्वेलरीचे दर कमी असल्याचेही ते म्हणाले. बेळगाव प्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांकडेही कंपनीने लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.
(२)
![]() |
ऋषिकेश घाग (Entice, KGK - मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह) |
यावेळी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ऋषिकेश घाग म्हणाले, जयपूर येथील Entice KGK 1905 या ज्वेलरी कंपनीला ११७ वर्षे पूर्ण झाली आहेत. जगभरातील १६ देशांमध्ये कंपनीचा कारभार होतो. यामध्ये सुमारे १२,००० कर्मचारी कार्यरत आहेत. येथे फक्त हिऱ्यांचेच दागिने बनवण्याचे काम होते. मायनिंग पासून मॅन्युफॅक्चर पर्यंतची सर्व प्रक्रिया एकाच छताखाली होते. त्यामुळे येथे बनवल्या जाणाऱ्या डायमंड ज्वेलरीचे (हिऱ्याच्या दागिन्यांचे) दर मार्केट दरापेक्षा जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कमी असल्याचे त्यांनी सांगितले. Entice KGK 1905 मध्ये हॉलमार्क असलेले रु. १५ हजार ते १ कोटी रुपयांपर्यंत विविध समारंभासाठी , भेट देण्यासाठी अथवा कार्यालयीन वापरासाठी विविध प्रकारचे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. याशिवाय दागिने खरेदी नंतर ग्राहकांना इन्व्हाईस व सर्टिफिकेट दिली जात असल्याचेही ते म्हणाले.
एकंदरीत Entice, KGK 1905 कंपनीच्या डायमंड ज्वेलरीला बेळगाव शहरात मागणी आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना अखेरीज किंवा मार्च महिन्यामध्ये अक्षय तृतीयेपूर्वी शहरात ज्वेलरी प्रदर्शन भरविले जाणार आहे. ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन Entice, KGK 1905 कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments