सांबरा / मोहन हरजी 

सांबरा येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत प्रवेशासाठी गावातून प्रभात फेरी काढून जागृती करण्यात आली.

शाळेतील पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पालकांना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच शाळेच्यावतीने राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि उपलब्ध सोयी सुविधांचे माहिती पत्रकाचे पालकांना वाटप करण्यात आले.    

दुर्गादेवीगल्ली, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, महात्मा फुले गल्ली, गणेश नगर, रेणूका गल्लीमार्गे प्रभात फेरी काढण्यात आली. सहभागी विद्यार्थांनी घोषणा देवून लक्ष वेधून घेतले. एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी, उपाध्यक्षा सुनीता जत्राटी, सदस्य लक्ष्मण जोई, दीपक जाधव, अशोक लोहार, अनिल चौगुले, तानाजी कलखाबकर, दीपा धर्मोजी, पूजा लोहार, रेश्मा हुच्ची, मुख्याध्यापिका ए ए पाटील, शिक्षक व्ही एस कंगराळकर, ए. बी. पागाद, टी. व्ही. पाटील, आर. बी. लोहार,  हलगेकर आदी सहभागी झाले होते.