अथणी / वार्ताहर 

अथणी शहरातील हारूगेरी मार्गावर हॉटेल मंजुश्री समोर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला. यावेळी ट्रॅक्टर खाली सापडल्याने तिघेजण खंबीर जखमी झाले. जखमींमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारी अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.

अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर ऊस पसरला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने ऊस बाजूला करून उसाच्या ढगाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले आणि अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मिरज येथील रुग्णालयात दाखल केले.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची नोंद अथणी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.