• गळफास घेऊन संपविले जीवन  


विजयपूर / वार्ताहर 

एका सरकारी शिक्षकाने शासकीय कार्यालयाच्या आवारात  गळफास घेऊन आत्महत्या केली. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सिंदगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. बसवराज असे आत्महत्या केलेल्या सरकारी शिक्षकाचे नाव असून तो सिंदगी तालुक्यातील सासबाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच त्याने शासकीय कार्यालय विशेषत: तहसीलदार कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या प्रकरणातील गुढ आणखीनच वाढले आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सिंदगीच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाची नोंद सिंदगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.