सांबरा / मोहन हरजी 

हळ्याल येथील व्ही. आर. देशपांडे मेमोरीयल ट्रस्ट आणि राज्य कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मुतगे येथील राणी केदार हिने ४२ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. 

तिला प्रशास्तीपत्र, मानचिन्ह आणि रोख १० हजार देऊन  गौरविण्यात आले. राणी बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलला सराव करत असून तिला कोच नागराज आणि हणमंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.