•  जय कर्नाटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय रजपूत यांची मागणी 
  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय कर्नाटक संघटनेचे आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरात शैक्षणिक संस्थांच्या परिसराच्या आजूबाजूला गांजा, पन्नी यासारखे अवैध धंदे सुरू असून असे बेकायदेशीर कृत्य विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जय कर्नाटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय रजपूत यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या संदर्भात जय कर्नाटक संघटनेने आंदोलन छेडले . यावेळी बोलताना संजय रजपूत म्हणाले की , गांजा, पन्नी यांसारख्या अमली पदार्थांच्या व्यसनाला विद्यार्थी बळी पडत आहेत, जे त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. येत्या एप्रिल आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होणार आहे.अभ्यासाकडे लक्ष न देता मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे अशा अवैध अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

यावेळी संजीव भजंत्री गौस सनदी, बैलहोंगल तालुकाध्यक्ष युसूफ शिगीहल्ली, सदानंद गौडर, मकानदार , व्यंकटेश,सुलेमान जमादार आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.