विजयपूर / वार्ताहर
कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे. मुद्देबिहाळ तालुक्यातील हडलगेरीजवळील केबीजेएनएल कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला.
25 वर्षीय रसूल मालदार आणि 10 वर्षीय बालक समिउल्लाह गोळसंगी अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील चिम्माड या गावचे ते रहिवासी आहेत. दोघेही मजूर असून, मुद्देबिहाळ येथील एका चिकन सेंटरमध्ये काम करत होते. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
0 Comments