खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहराजवळील शिवाजी नगरात दत्ताराम गावडे यांच्या घराच्या गेटजवळ विद्युत खांब्याच्या आधारासाठी तार रोवली आहे. त्यामुळे वाहन घेऊन जाण्यास अडचण भासत आहे ती तार काढावी, अशी मागणी करण्यात आली.
जयराम पाटील यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून दोन विद्युत खांबे पडले आहेत ते बदलावे अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप बदलेले नाही. नागुर्डा येथील शिवारात विदयुत खांब कोसळण्याच्या मार्गावर आहे. तो बदलावा. तसेच टी सी बसवावी, अशी नागुर्डा येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी मागणी केली. नंदगड येथील शिवारात विद्युत खांब उभारण्यात यावे, अशी मागणी नंदगड गावचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी केली. याचबरोबर नंदगड गावच्या सुरेखा पाटील यांनी सर्वे नंबर १९३ मध्ये ३ एच पी पंप सेटसाठी अर्ज केला आहे. त्याची पुर्तता झाली नाही आदी समस्या नागरिकांनी हेस्कॉमच्या ग्राहक मेळाव्याच्या बैठकीत केल्या.
यावेळी ग्राहक मेळाव्याला बेळगाव जिल्हा हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते प्रविण कुमार चिकाडे, खानापूर हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर, सहाय्यक अभियंते श्री रंगनाथ आदी उपस्थित होते. पावेळी अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा कार्यकारी अभियंते प्रविण कुमार चिकाडे यांनी समस्यांचे निवारण करून येत्या चार दिवसांत सर्व समस्या दूर करू असे आश्वासन दिले,हेस्कॉमच्या ग्राहक मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी नागरिक, हस्कॉमचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभियंत श्री रंगनाथ यांनी मानले.
0 Comments