सांबरा / मोहन हरजी
सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि गावाकऱ्यांच्यावातीने आयोजित कुस्ती आखाड्यात पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने मध्यप्रदेश केसरी सुदेश ठाकूर याचा 18 व्या मिनिटाला एकलंगी डावावर विजय मिळवून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
विमानतळ नाजिकच्या मैदानावरील भव्य आखाड्यात पै.कार्तिक काटे आणि पै. सुदेश ठाकूर यांची कुस्ती गंगन्ना कल्लूर, शिवराज जाधव, राष्ट्रकुल पदक विजेते शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर आणि सांबरा कुस्तीगीर कमिटीच्यावतीने लावण्यात आली. एकमेकांची ताकद आजमावत ही कुस्ती डाव प्रतिडावाने रंगली. 18 व्या मिनिटाला कार्तिकाने सुदेशवर कब्जा मिळवून पायाला आकडी लावत एकलंगी डावावर विजय मिळवला.
कर्नाटक केसरी पै.नागराज बसुडोणी आणि भूषण पवार, नासिक यांच्यातील दोन नंबरची कुस्ती अडव्होकेट रमेश पाटील, नागाप्पा बाळू चौगले, पुंडलिक जोई यांच्या हस्ते लावण्यात आली. यात नागराजने एकलंगी डावावर भूषणला आस्मान दाखवले.
कर्नाटक केसरी पै. संगमेश बिरादार आणि पै.शुभम कोळेकर यांच्यातील तिसऱ्या क्रमांकाची लढत बरोबरीत सोडवण्यात आली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. कीर्तिकुमार कार्वे यांने सुनील कवठेपिरान याचा गुणावर पराभव केला. पाचवी कुस्ती पै. विशाल शेळके आणि पै.रोहित कंग्राळी यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. विक्रम शिनोळी यांने सांगलीच्या प्रताप ठाकूरवर विजय मिळवला. पै. प्रेम कंग्राळी यांने सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत
पवन चिकदिनकोपचा पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक इंगळगीने वि. गुद्याप्पा दावणगेरीचा पराभव केला. मेंढाच्या कुस्तीत प्रवीण निलजी यांने महादेव दऱ्याण्णावर विजय मिळवला. सुशांत कंग्राळी, संकल्प कंग्राळी, रोहित कवठेपिरान, पंकज चापगांव, चिन्मय येळूर, वैभव सांबरा, ओम कंग्राळी, राहुल किणये, ओमकार सावगाव, मंथन सांबरा, हर्ष कंग्राळी, परशराम चलवेनट्टी आदींनी प्रतिस्पर्धीवर विजय मिळवले. मैदानात 60 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.चार लढती मेंढ्यांसाठी झाल्या.
निशाणीचे पूजन दूध संघांचे अध्यक्ष महादेव अष्टेकर, लक्ष्मण यड्डी, दुर्गादेवी प्रतिमा पूजन संजू पाटील, छ. शिवारायांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि पं सदस्य नागेश देसाई, हनुमान प्रतिमा पूजन मल्लाप्पा मोगलाई, आखाड्याचे उदघाटन दिशा कमिटी सदस्य राजू देसाई, आणि पूजन इराप्पा जोई आदींच्या हस्ते करण्यात आले. संजू पाटील, शिवाजी जत्राटी, डॉ. एम बी जोई, कुस्ती मल्लवीद्या आश्रयदाते सतीश पाटील, बाळकृष्ण मुतगेकर, महेश चिंगळी, तानाजी इरोजी, तानाजी गावडे, विठ्ठल अप्पायचे, श्रीराम सेनेचे तालुका अध्यक्ष भरत पाटील, अरुण डुमरकी, ग्रा. पं. सदस्य शंकर यड्डी, शशिकांत कोकितकर, विक्रम सोनजी, शुभम ताडे, अब्दुल बागवान, लक्ष्मण पालकर, इब्राहिम संगत्रास, भरमा जक्कनावर आदी मान्यवर उपस्थित होते.
मैदान यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, पै. नवीन पाटील, पै मुकुंद मुतगेकर, यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, महेंद्र गोठे, कृष्णा जोई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, मोहन हरजी, शीतलकुमार तिप्पाण्णाचे, सिद्राई जाधव, नितीन चिंगळी, शिवाजी मालाई, प्रवीण ताडे, भुजंग धर्मोजी, यल्लाप्पा जोगानी, परशराम हरजी, वैजू पालकर, अप्पानी यड्डी, मारुती यड्डी, लक्ष्मण जोई यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेत आहे.
0 Comments