बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 'चलो मुंबई' मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. मोर्चाच्या पूर्वतयारीसह हे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील मंत्री, महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले सीमा समन्वयक मंत्री, यांच्याशिवाय इतर राजकीय पक्षांचे नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात शिवाजी सुंठकर, ॲड. एम.जी.पाटील, सुनील अष्टेकर, विकास कलघटगी, आर.आय. पाटील आणि महादेव मंगाणकर यांचा सहभाग आहे.
0 Comments