- रामदुर्ग तालुक्याच्या कडलीकोप्प गावानजीक घटना
- क्रुझर व दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघात
रामदुर्ग / वार्ताहर
क्रुझर व दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कडलीकोप्प (ता. रामदुर्ग जि. बेळगाव) नजीक हा अपघात झाला. महानिंग नांजप्पा अचमट्टी (वय २५ रा.भाग्यनगर रामदुर्ग) रफिक चलवादी (वय २६, रा. मड्डीगल्ली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर उन्नीस मुहम्मद पटेल (रा.आश्रय कॉलनी रामदुर्ग) व मारुती बंडीवड्डर (रा.भाग्यनगर रामदुर्ग) अशी जखमींची नावे आहेत.
उन्नीस मुहम्मद पटेल यांच्यावर बागलकोट रुग्णालयात तर मारुती बंडीवड्डर यांच्यावर स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावातून दोन दुचाकींवरून चौघेजण रामदुर्गाकडे येत असताना शिरसंगीकडे जाणार्या क्रुझरला समोरून धडक बसल्याने हा अपघात घडला. या घटनेची नोंद रामदुर्ग पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments