- राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान सोहळा शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रा. टी.जी. सिताराम (नवी दिल्ली) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू विद्याशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या समारंभात 707 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी बहाल करण्यात येणार आहे. विविध विषयात गुणवत्ता विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके बहाल करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना राहिलेल्या विषयांची पदवी परीक्षा देण्याची सुवर्णसंधी प्रदान करण्यात आली आहे. कुलगुरू विद्याशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यापीठाचे रजिस्टर प्रा. बी.ई. रंगास्वामी आणि प्रा. टी. एन. श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.
0 Comments