बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे.महापालिका सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे दोन्ही पदे पटकावली आहेत

निवडीनंतर भाजप राज्य प्रवक्ते ऍडएमबीजिरली आणि आअभय पाटील यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिलीभाजप सर्व भाषिकांना सोबत घेऊन जाणारा राष्ट्रीय पक्ष आहेबेळगावच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले

बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक सकाळी प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली पालिका सभागृहात पार पडली. दोन्ही जागांसाठी भाजपकडून नगरसेवकांनी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी भाजप नगरसेविका सारिका पाटील, शोभा सोमनाचे, माधवी राघोचे, नेत्रावती भागवत यांनी महापौर पदासाठी अर्ज सादर केले. त्यानंतर पक्षाच्या निर्णयानुसार सारिका पाटील, माधवी राघोचे आणि नेत्रावती भागवत यांनी अर्ज माघारी घेतलेत्यामुळे बहुमत प्राप्त भाजपतर्फे महापौरपदासाठी प्रभाग क्र. ५७ च्या नगरसेविका शोभा सोमनाचे या एकमेव उमेदवार रिंगणात राहिल्या. त्यामुळे त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. उपमहापौरपदासाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक 33 च्या सदस्या रेश्मा पाटील, . . समितीकडून वैशाली भातकांडे आणि अस्मिता पाटील यांनी अर्ज सादर केले. निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांनी अर्जाची छाननी करून सर्व अर्ज स्वीकारले.

यावेळी भाजपचे महापौर-उपमहापौर निवडणूक प्रभारी निर्मलकुमार सुराणा, . अभय पाटील, . अनिल बेनके, भाजप प्रवक्ते एम.बी.जिरली उपस्थित होते. हात उंचावून घेतलेल्या मतदानात शोभा सोमनाचे महापौरपदी तर रेश्मा पाटील उपमहापौरपदी निवडून आल्या. 


गेल्या 30 वर्षांपासून महानगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता होती. मात्र यावेळी प्रथमच महानगरपालिका निवडणूक राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर झाली होती. या निवडणुकीत म. ए. समितीचे तीन नगरसेवक निवडून आले होते. तर महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले होते. असे असतानाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांच्या मतांवर लक्ष केंद्रित करून भाजप कोअर कमिटीने महापौर - उपमहापौर पदावर मराठी भाषिकांची निवड केल्यामुळे बेळगाव दक्षिण मतदार संघातील शोभा सोमनाचे या महापौरपदी तर उत्तर मतदार संघातील रेश्मा पाटील उपमहापौर पदी विराजमान झाल्या आहेत. परिणामी महानगरपालिकेवर  मराठी भाषिकांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर लिंगायत समाजाचे महांतेशनगर प्रभागातील नगरसेवक राजशेखर डोणी यांची सत्ताधारी गटाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.